Weekend is here! Monsoon चे तालरंग पाहा आणि बेत आखा तुमच्या पावसाळी ट्रेकचे

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागात पुढच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज 

Updated: Jun 24, 2022, 07:43 AM IST
Weekend is here! Monsoon चे तालरंग पाहा आणि बेत आखा तुमच्या पावसाळी ट्रेकचे title=
छाया सौजन्य- Wandering Souls india / instagram

Monsoon Updates :  India Meteorological Department (IMD) भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढच्या पाच दिवसांमध्ये विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहेत. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत हवामान विभागानं कर्नाटक, कोकण, गोवा, लक्षद्वीप या भागांमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचं सांगितलं आहे. (weekend monsoon updates rain konkan mumbai news)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्र प्रदेश या भागातही समाधानकारक पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागात पुढच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुतराजच्या काही भागातही पावसाची हीच स्थिती 26 जूनपर्यंत कायम असेल. 

गोवा आणि कोकण भागात पावसाचा जास्त तडाखा बसणार आहे. फक्त महाराष्ट्र आणि दक्षिण भारत नव्हे, तर अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम आणि काही हिमालय पर्वतरांगांच्या प्रदेशातही पुढील पाच ते सहा दिवस जोरदार किंवा तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

येत्चा काही दिवसांमध्ये वर्तवण्यात आलेला पावसाचा अंदाज पाहता आणि आठवड्याची अखेर पाहता येऊ घातलेल्या सुट्टीसाठी तुम्ही ट्रेकिंग किंवा एखाद्या ठिकाणी पावसाळी सहलीचा बेतही आखू शकता. 

महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट 
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवसांसाठी मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच इथं मुसळधार ते अतीमुसळधधार पावसाची शक्यता आहे. 

तर, महाराष्ट्रातील काही भागांना पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी रायगडमध्ये जोरदार पाऊस असेल, तर रत्नागिरीतही परिस्थिती काहीशी अशीच असेल.