Maratha Reservation : मराठ्यांना कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे वारंवार डॉ.पंजाबराव देशमुखांचा उल्लेख करतायत. भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुखांमुळेच विदर्भातील मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळालं. मात्र मराठ्यांना कुणबी आरक्षण कसं मिळालं, त्यासाठी पंजाबराव देशमुखांनी काय केल जाणून घेवूया.
राज्यात अनेक भागात मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्रं आहेत, त्याचं पूर्ण श्रेय जातं डॉ. पंजाबराव देशमुखांना.. पंजाबराव देशमुख यांची दूरदृष्टी होती म्हणून विदर्भातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली.. पंजाबराव देशमुखांचा आरक्षणासंबंधीचा फॉर्म्युला काय होता आणि त्यासाठी त्यांनी नेमकं कशापद्धतीनं कार्य केलं
सुरुवातीला संविधान सभेचे कामकाज सुरू असताना मराठा समाज मागास असल्याची भूमिका पंजाबराव देशमुखांनी मांडली. पंजाबराव देशमुख हे घटना समिती चे सदस्य होते. आरक्षणाचा निकष हा जातपात किंवा संप्रदाय नसावा तर आर्थिक दुर्बल घटक असावा असा विचार त्यांनी 22 नोव्हेंबर 1949 ला घटना समिती समोर मांडला. आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 340 मध्ये आरक्षणाची तसेच राष्ट्रपतींनी आदेश काढण्याची तरतूद केली.
1953 मध्ये कालेलकर समिती स्थापन झाली तेव्हा या समितीने OBC घटक पुढे आणला. विदर्भातील मराठ्यांनी कुणबी या जातीची दस्ताऐवजामध्ये नोंद करावी यासाठी पंजाबराव देशमुखांनी मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन केलं आणि जनजागृती केली. जातप्रमाण पत्राची प्रक्रिया ही नोंदी आणि दस्तऐवजामधून होते त्यामुळे पंजाबराव देशमुखांनी मुंबईत सभा घेऊन जातीची नोंद दस्तऐवजात करून घेण्याचे आवाहन केले. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर विदर्भातील विशेष करून अमरावती विभागातील मराठा समाजाला आरक्षण मिळायला सुरुवात झाली 1960 च्या दशकांत मराठा शेतकरी हा मराठा कुणबी असल्याची मांडणी केली गेली. या मागणीला घटनात्मकदृष्ट्या मंजुरी मिळाली होती.
पंजाबराव देशमुख यांनी मराठा हे कुणबी असल्याचं पुराव्यावरुन सिद्ध केलं होतं.. त्यामुळेच पंजाबराव देशमुख फॉर्म्युल्याचा आधार घेत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं असा पर्याय जरांगे-पाटलांनी दिलाय. जे 1950-60 मध्ये घडू शकलं ते आता घडायला नेमकी अडचण काय आहे अशीही चर्चा यानिमित्तानं सुरु झालीय..