मुंबई : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) 23मार्च रोजी जाहीर केले की, 45 वर्षापेक्षा जास्त वयाचा प्रत्येक व्यक्ति १ एप्रिलपासून कोविड19 च्या लसीसाठी पात्र आहेत.
तज्ञांच्या मते, देशातील सध्याची परिस्थिती पाहाता, आणि कोरोनाचा धोका लक्षात घेता ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि लोकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्णांत काही प्रमाणात वाढ झाली आहे.
मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे, हात स्वच्छ करणे आणि सर्व पात्र लोकांनी लसीकरण कराणे. या गोष्टींमुळे आपण कोरोनावर मात करु शकतो. परंतु लसीकरणाच्या दुसर्या डोस संदर्भातील शंका लक्षात घेऊन सरकारने सामान्यपणे विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
1 एप्रिलपासून, 45 वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती लस घेण्यासाठी पात्र आहे. 1 जानेवारी 1977 आधी ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे, त्यांना ही लसी मिळणार आहे.
Oxford-AstraZeneca म्हणजेच 'कोव्हिशिल्ड' ही पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची लस आणि भारत बायोटेक-इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची 'कोव्हॅक्सिन' या दोन्ही कॉव्हिड -19 वरच्या लसींना देशाने आपत्कालीन वापराचा परवाना दिला आहे. दोन्ही लस दोन डोसमध्ये घेणे आवश्यक आहे.
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी चार ते सहा आठवड्यांपासून आता चार ते आठ आठवड्यांपर्यंत करण्यात आला आहे. तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस हा चार ते सहा आठवड्यांपर्यंत घेतला जाऊ शकतो. मंत्रालयाने असे म्हंटले आहे की, चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी दोन्ही डोस सांगितलेल्या कालावधीत घेतले गेले पाहिजेत. तसेच दोन्ही डोस एकाच कंपनीचे असावे.
नवीन पात्र लाभार्थी Co-WIN (Covid Vaccine Intelligence Work) पोर्टलमार्फत आपली नोंदणी करू शकतात. त्यांचे स्लॉट 1 एप्रिलपासून सुरु झाले आहेत.
कोविशिल्ड लसीसाठी auto-schedulingचे फिचर नसल्यामुळे, नवीन लाभार्थी तसेच ज्यांनी आधी डोस घेतला आहे, त्यांना आता दुसरा डोस घ्यायचा आहे. ते लोकं वरिल दिलेल्या माहितीनुसार दोन लसींच्या अंतरानुसार आपला दुसरा डोस घेण्याची तारीख निवडू शकतात.
लाभार्थींना नोंदणी किंवा अपॉइंटमेंटशी संबंधित काही अडचणी असल्यास ते राष्ट्रीय हेल्पलाईन ‘1075’ वर संपर्क साधू शकतात.
लस मिळाल्यानंतर (पहिला किंवा दुसरा डोस असो) संबंधीत सेंन्टरमधून लाभार्थ्यांना त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र मिळेल. ते प्रमाणपत्र हार्ड कॉपी किंवा डिजिटल कॉपी मार्फत दिले जाऊ शकेल. सरकारी रूग्णालयात लसीकरण व प्रमाणपत्र मोफत उपलब्ध आहे. तर खासगी रूग्णालयात लसीकरण 250 रू. आहे त्यात लस आणि प्रमाणपत्र दोघांच्या किंमतीचा समावेश आहे.
लसींच्या साठ्यात कमतरता नसल्याने घाबरून जाण्याची गरज नाही, सरकारने यावर लक्ष देऊन लसींच्या उत्पादनावर भर दिला आहे.