पहेचान कौन? कणकवली महायुतीचा नक्की उमेदवार कोण?

राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असणारा मतदार संघ म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघ आहे.

Updated: Oct 10, 2019, 11:10 PM IST
पहेचान कौन? कणकवली महायुतीचा नक्की उमेदवार कोण? title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असणारा मतदार संघ म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात नेमका महायुतीचा उमेदवार कोण अशी संभ्रमावस्था इथल्या कार्यकर्त्यांमध्ये झाली आहे. कणकवली महायुतीचा नक्की उमेदवार कोण? नितेश राणे की सतीश सावंत? उमेदवारीबाबत शिवसेनेची यावर अळीमिळी गूपचिळी केली आहे.

कणकवलीत महायुतीचा नक्की उमेदवार कोण असा प्रश्न तिथल्या मतदारांना पडलाय. असा प्रश्न विचारण्याचं करणं म्हणजे शिवसेनेचे सभांमधील बॅनर. सतीश सावंत हेच महायुती उमेदवार असल्याचे शिवसेना सांगतेय. विशेष म्हणजे सगळ्याच पक्षांचा सतीश सावंत यांना पाठिंबा असल्याचा दावा शिवसेना करतेय.

दुसरीकडे भाजपा कणकवलीच्या जागेबाबत सावध पवित्रा घेताना दिसतेय. कणकवलीत महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं सांगताना नितेश राणे यांचं नाव मात्र भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी घेतलेलं नाही.

दुसरीकडे नितेश राणे हे संघाच्या दसरा मेळाव्याच्या संचलनाला उपस्थित राहून भाजपावाले सांगण्याचा प्रयत्न केला. सतीश सावंत यांनी यावरही टीका केलीय.

खरं तर कणकवलीची निवडणूक ही राणे विरुद्ध शिवसेना अशीच होतेय. भाजपाविरोधात शिवसेनेचा बंडखोर असताना मुख्यमंत्र्य़ांनी उद्धव ठाकरेंना का अडवलं नाही, असा सवालही विचारला जातोय. शिवसेना पुरस्कृत उमेदवाराला भाजपाची रसद नाही ना अशी चर्चा कणकवलीत सुरु झालीय.