close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीला का धावली एमआयएम?

औरंगाबादच्या राजकारणात विळ्या भोपळ्याचं सख्य असणारे शिवसेना आणि एमआयएम विधानपरिषद निवडणुकीत एकत्र आल्याची चर्चा आहे. मात्र ही मदत का केली?, अर्थपूर्ण चर्चेतून मार्ग निघाल्याचीही माहिती आहे. यातूनच आता एमआयएममध्ये एक वेगळा गोंधळ निर्माण झाला आहे.

Updated: Aug 21, 2019, 06:10 PM IST
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीला का धावली एमआयएम?

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादच्या राजकारणात विळ्या भोपळ्याचं सख्य असणारे शिवसेना आणि एमआयएम विधानपरिषद निवडणुकीत एकत्र आल्याची चर्चा आहे. मात्र ही मदत का केली?, अर्थपूर्ण चर्चेतून मार्ग निघाल्याचीही माहिती आहे. यातूनच आता एमआयएममध्ये एक वेगळा गोंधळ निर्माण झाला आहे.

विधानपरिषद निवडणुकीत एमआयएमनं शिवसेनेला मतदान केल्याची चर्चा आहे. अगदी एकजूटीनं एमआयएमचे नगरसेवक मतदानाला आले आणि मतदानाच्या एक दिवस आधी झालेल्या गुप्त बैठकीत ठरल्याप्रमाणं मतदानसुद्धा करून गेले. या बैठकीत मध्यस्थी केली ती शिवसेना आणि एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी. त्यात काही तरी ठरलं सुद्धा. मात्र मतदान झाल्यावरही ठरलेलं पूर्ण न झाल्यानं एमआयएमचे नगरसेवक आता चांगलेच संतापले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार मध्यस्थी केलेल्या त्या दोन नगरसेवकांना एमआयएमचे इतर नगरसेवक मंगळवारी दिवसभर शोधत होते. अखेर रात्री ते मिळाले आणि तरीही दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्यानं चांगलाच वाद रंगला. अगदी वातावरण तापण्याइतकाहा वाद पेटला.

औरंगाबादच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे दोन पक्ष. फक्त अर्थ हित साधून घेण्यासाठी हे जवळ आले. त्यात शिवसेनेनं त्यांना हितही हात दाखवल्याने ते आता चांगलेच वैतागले. मतदान संपलंय, आता आश्वासन पूर्ण होणार का प्रश्न आहे. त्यातून मध्यस्थी केलेल्या नगरसेवकांना मात्र पळण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे चित्र आहे.