ठाणे, नवी मुंबईत आता अदानी इलेक्ट्रिसिटी; महावितरण कर्मचा-यांचा संपाचा इशारा

मुंबई उपनगरांत वीजपुरवठा करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी आता भांडूप, मुंलूंड, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, नवी मुंबई, खारघर, पनवेल, तळोजा आणि जेएनपीटी परिसरात वीज पुरवठा करणार आहे. त्यामुळे महावितरणला स्पर्धा निर्माण होणार आहे. 

Updated: Nov 27, 2022, 11:42 PM IST
ठाणे, नवी मुंबईत आता अदानी इलेक्ट्रिसिटी; महावितरण कर्मचा-यांचा संपाचा इशारा title=

स्वाती नाईक, झी मीडिया,  नवी मुंबई :  मुंबईच्या उपनगरांमध्ये अदानी कंपनीतर्फे(Adani Electricity) वीज पुरवठा केला जातो. ठाणे(Thane), नवी मुंबईत(Navi Mumbai) आता अदानी इलेक्ट्रिसिटी सेवा मिळणार आहे. महावितरण(MSEB) आणि अदानीमध्ये स्पर्धा रंगली आहे. विजेसाठी ग्राहकांना नवा पर्याय मिळणार आहे. महावितरण कर्मचा-यांचा अदानीला विरोध असून त्यांनी संपाचा इशारा दिला आहे.

मुंबई उपनगरांत वीजपुरवठा करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी आता भांडूप, मुंलूंड, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, नवी मुंबई, खारघर, पनवेल, तळोजा आणि जेएनपीटी परिसरात वीज पुरवठा करणार आहे. त्यामुळे महावितरणला स्पर्धा निर्माण होणार आहे. 

अदानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून या भागात वीज वितरणाचं नियोजन करणार आहे. पण महावितरणनं याचा विरोध केलाय. थेट संपावरच जाण्याचा इशारा कर्मचा-यांनी दिलाय. यासाठी हरकती आणि सूचना मागवण्यासाठी 30 दिवसांची मूदत देण्यात आली आहे.

सध्या मुंबई वगळता महाराष्ट्रात सर्वत्र महावितरणतर्फे वीज पुरवठा केला जातो. मात्र, अदानी ग्रुप मुंबई बाहेरदेखील वीज सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे.