देवदर्शनाला नववधू पतीसोबत आली, प्रियकराबरोबर पळून गेली

देवदर्शनाला गेलेल्या नववधूने आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पलायन केले.

Updated: Jun 22, 2019, 08:27 AM IST
देवदर्शनाला नववधू पतीसोबत आली, प्रियकराबरोबर पळून गेली title=

अहमदनगर : दोन-तीन दिवसापूर्वी लग्न झाले. त्यानंतर नववधू-वर देवदर्शनासाठी गेले. मात्र, यावेळी धक्कादायक प्रकार घडला. देवदर्शनाला गेलेल्या नववधूने आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडल्याचीबाब पुढे आली आहे. शेवगाव येथील नवविवाहित दाम्पत्य देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. 

पाथर्डी तालुक्यतील मढी येथील कानिफनाथ देवस्थाला दर्शनासाठी नवदाम्पत्य आले होते. देवदर्शनानंतर पतीने पत्नीला इथे थांब मी पार्किंगमधून गाडी आणतो असे सांगून गेला. मात्र, गाडी घेऊन आल्यानंतर आजुबाजूला पत्नी नव्हती. त्यावेळी पती भांबावून गेला. अधिक चौकशी केली. मात्र, पत्नी आजुबाजूला दिसली नाही. त्याने धाव देवस्थानच्या लोकांकडे घेतली. त्याने सीसीटिव्ही फुटेज बघण्याची विनंती केली. त्यावेळी घडलेला प्रकार त्याला समजला आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरखली.

नवदाम्पत्य देवदर्शन घेत असताना एक व्यक्ती त्यांचा माग काढत होती. त्यावेळी नववधू त्याला इशाराही करत होती. पती गाडी आणण्यासाठी गेल्याचे पाहून तिच्या मागावर असलेल्या प्रियकरासोबत लगेच तिने पोबारा केला. देवस्थाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपली पत्नी दुसऱ्या मुलासोबत बाईकवरुन बसून गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर पतीने पाथर्डी पोलिसात तक्रार दिली. दरम्यान देवस्थाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस नववधूचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी दिली.