लातूरच्या विकासाचा पॅटर्न तयार करणार- मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे बोगी आणि देशातील पहिल्या मेट्रो कोच कारखान्याचे भूमिपूजन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. लातूर शहराजवळील हरंगुळ इथं हा कारखान तयार होतो आहे. लातूरचा रेल्वे डब्ब्यांचा कारखाना हा सर्वात कमी कालावधीत तयार होणार कारखाना असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

shailesh musale Updated: Apr 1, 2018, 10:24 AM IST
लातूरच्या विकासाचा पॅटर्न तयार करणार- मुख्यमंत्री title=

लातूर : महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे बोगी आणि देशातील पहिल्या मेट्रो कोच कारखान्याचे भूमिपूजन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. लातूर शहराजवळील हरंगुळ इथं हा कारखान तयार होतो आहे. लातूरचा रेल्वे डब्ब्यांचा कारखाना हा सर्वात कमी कालावधीत तयार होणार कारखाना असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

एक ते दीड वर्षात होणार सुरु

राज्यात मेट्रोचे रेल्वेचे मोठ काम सुरु आहे. त्यासाठीचे कोच परदेशातून मागवावे लागत. मात्र हेच कोच देशात तयार होऊन देशातील पैसा देशातच राहील अशी सूचना मांडल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीसाठी हिरवा झेंडा दाखविल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांनी स्पष्ट केले. येत्या एक ते दीड वर्षात हा रेल्वे बोगीचा कारखाना तयार होणार असून याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. 

लातूरच्या विकासाचा पॅटर्न 

आतापर्यंत शिक्षणाचा पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूरच्या विकासाचा पॅटर्न तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी य़ावेळी जाहीर केलं.