20 ऑगस्टला शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचा आदेश घेऊन आलात तरच... संघर्ष समितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा

 महामार्ग रद्द केल्याशिवाय मंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 17, 2024, 06:09 PM IST
20 ऑगस्टला शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचा आदेश घेऊन आलात तरच... संघर्ष समितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा title=

Nagpur Goa Shatabdi Mahamarg : नागपूर आणि गोव्याला जोडणा-या शक्तिपीठ महामार्गाविरोधात शतेरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी एकटले आहेत. नागपूर आणि गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा.  शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचा आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 20 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या  कोल्हापूर दौ-यावेळी निदर्शनं करणार असल्याचा इशारा, शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं दिलाय. महामार्ग रद्द केल्याशिवाय मंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही. तसंच फेररचना नको, स्थगिती नको, महामार्ग रद्द झाल्याचा आदेश घेऊनच मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यावं असं शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती म्हंटल आहे. 

नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गा विरोधात सांगलीमध्ये देखील शेतक-यांनी आंदोलन केले होते. महामार्गामुळे बाधित होणा-या शेतक-यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शासनानं हा महामार्ग रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला होता.

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गला शेतकऱ्यांचा  विरोध का?

प्रामुख्याने  कोल्हापूर आणि सांगलीमधील शेतकरी नागपूर आणि गोवा शक्तिपीठ महामार्गला  विरोध करत आहेत.  कोल्हापूर तसंच सांगलीसह एकूण 11 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जातोय.. मात्र शेकडो एकर जमीन प्रभावीत होत असल्याने तो रद्द करण्याची मागणी शेतकरीच नाही तर सत्ताधारी पक्षातले मंत्री तसंच आमदारसुद्धा करत आहेत. शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित करत असलेल्या जमिनीपैकी बहुतांश जमीन ही जिरायती आणि बागायती आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 59 गावांमध्ये शेकडो एकर जमीन यामुळे प्रभावित होणार आहे.. हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी कोल्हापूरच नाही तर सांगली जिल्ह्यातूनही करण्यात आली.

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाची वैशिष्ट्ये

नागपूर ते गोवा प्रवासासाठी 18 तास लागतात.  शक्तिपीठ महामार्गामुळे हा प्रवास 8 तासांत शक्य होणार आहे. वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे.