शिक्षिकेकडून शिक्षणाधिकाऱ्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार

आंनद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक डी बी घात यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

Updated: Apr 29, 2018, 07:51 PM IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद लैंगिक छळ प्रकरणी पीडित महिलेची तक्रार दाखल करून घेण्यास विलंब लावल्या प्रकरणी, आंनद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक डी बी घात यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. चौकशी अहवालानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ही कारवाई केली आहे. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार देण्यासाठी आलेल्या, एका पीडित शिक्षिकेला आनंदनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांनी अपराध्यासारखी वागणूक दिली होती. 

तर आरोपी जगताप यावर कारवाईस दिरंगाई केली. चौकशी अंती या प्रकरणी दोषी आढळल्यानं त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रकरणी दोषी असलेल्या इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही खात्यांतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.