कामाचा ताण नको, म्हणून स्वेच्छा निवृत्तीचा मार्ग?

दोन हजार कोटींची ठेव असलेली नवी मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरापासून ठेकेदारांनी महापालिकेच्या कामाकडे पाठ फिरवली होती.. ठेकेदारांसोबत आता महापालिका अधिकाऱ्यांनाही  महापालिका नकोशी झालीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 8, 2018, 03:40 PM IST
कामाचा ताण नको, म्हणून स्वेच्छा निवृत्तीचा मार्ग? title=

नवी मुंबई : दोन हजार कोटींची ठेव असलेली नवी मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरापासून ठेकेदारांनी महापालिकेच्या कामाकडे पाठ फिरवली होती.. ठेकेदारांसोबत आता महापालिका अधिकाऱ्यांनाही  महापालिका नकोशी झालीय.

कामाच्या तणावामुळे स्वेच्छा निवृत्तीकडे

कामाच्या तणावामुळे आणि वरिष्ठांना कंटाळून अनेक अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग पत्करलाय, गेल्या दोन वर्षात 32 अधिकाऱ्यांनी महापालिकेला रामराम ठोकत स्वेच्छा निवृत्ती पत्करलीय. तर अजून पाच अधिकाऱ्यांचे प्रस्ताव आयुक्तांकडे आहेत.

निलंबनाच्या कारवाईच्या धसका

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारल्या नंतर मुंढेनी घेतलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या धसक्याने अनेक अधिकाऱ्याचे मनोबल खचले होते.

रुग्णालयात भरती व्हावे लागले

अनेकांनी रुग्णालयात भरती व्हावे लागले होते ,आता तर कडक शिस्तीचे आणि शांत स्वभावाचे आयुक्त डॉ एन रामास्वामी असताना देखील महापालिका अधिकाऱ्यांची घरघर सुरूच आहे.