विश्वविक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांची अडीच एकरमध्ये रांगोळी !

परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात असणाऱ्या जवाहर विद्यालयात तब्बल ९ हजार ३८८ चौरस फुटाची छत्रपती शिवरायांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. हा एक विश्वविक्रम झालाय.

Updated: Feb 18, 2018, 11:14 AM IST
विश्वविक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांची अडीच एकरमध्ये रांगोळी ! title=

लातूर : परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात असणाऱ्या जवाहर विद्यालयात तब्बल ९ हजार ३८८ चौरस फुटाची छत्रपती शिवरायांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. हा एक विश्वविक्रम झालाय.

शिवप्रेमींनी एकच गर्दी 

कौसडी येथील ज्ञानेश्वर बर्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही भव्य रांगोळी साकारलीये. हा अनोखा विक्रम डोळ्यात साठवण्यासाठी शिवप्रेमींनी एकच गर्दी केली होती. 

महाराज यांची ३८८ वी जयंती

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती आहे. या जयंतीच औचित्य साधून प्राचार्य बळीराम वटाणे व शिवगर्जना प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने बर्वे यांनी रांगोळी साकारली आहे.