जगातील सर्वात मोठं मांजर कुठे आहे पाहा... फोटो पाहून तुम्हीही म्हणाल सो क्यूट...

पुण्यात हा सर्वात भव्य दिव्य पाळीव प्राणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे .

Updated: Nov 13, 2022, 05:31 PM IST
जगातील सर्वात मोठं मांजर कुठे  आहे पाहा... फोटो पाहून तुम्हीही म्हणाल सो क्यूट... title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: सध्या सगळीकडे आपल्याला प्राणी प्रेम (Pet Love) पाहायला मिळतं. अनेक जण पेट पेरेन्टिंगसाठी (Pet Parenting) पुढाकार घेताना दिसतात. सध्या हेच वाढलेलं प्राणी प्रेम पाहता पुण्यात एक पेट शो भरवण्यात आला आहे. प्राणीमात्रांवरील क्रूरतेला आळा घालण्यासाठी ''पेटगाला पेट शो, पुणे'' अशा नावाचा हा पेट शो भरवण्यात आला होता. या शोला प्राणीप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (World's Biggest Cat Priced Above 6 Lakhs in Animal Fair in Pune)

पुण्यात हा सर्वात भव्य दिव्य पाळीव प्राणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे .पेटगाला हा पाळीव (Pets) प्राणी प्रेमींचा एक आकर्षक मेळावा आहे. या कार्यक्रमात पाळीव प्राण्यांचा (Pet Parenting Videos) आनंद साजरा करण्याची एक खास संधी प्रत्येकाला दिली गेली फेलाइन क्लब ऑफ इंडिया (FCI) (Whiskas- MARS Petcare) या ब्रँडचे, पाळीव प्राण्यांचे अन्न आणि पोषण यामधील प्रमुख, संयुक्त विद्यमाने चार आंतरराष्ट्रीय परीक्षक या कार्यक्रमाचा निकाल जाहीर करतील. 

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

हे या शोमध्ये चॅम्पियनशिप कॅट शोचे परीक्षण करणार आहेत. 200 हून अधिक मांजरींचा (Cats) सहभाग असल्याची माहिती FCI चे अध्यक्ष साकिब पठाण यांनी दिली. पर्शियन, मेन कून, बंगाल आणि आमची स्वतःची इंडीमाऊ यांसारख्या विविध जाती यात आहेत. इव्हेंटमध्ये पाळीव प्राण्यांच्या (Cats Funny Videos) मनोरंजनासाठी काही खास मज्जा मस्ती ही अनुभवायला मिळत आहे, जसे की डॉग रनिंग गेम्स, पूल पार्टी, पेट फॅशन शो, इतर खेळ इत्यादी उपक्रम राबविण्यात आलेत . या मेळावा मध्ये सर्वात मोठी मांजर पुणेकरांना पाहायला मिळत आहे.  

हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या -  

पुण्यातील कॅम्प परिसरातून सायबेरीयन हस्की प्रजातीच्या श्र्वानला एका चोरट्याने पळून नेल्याची घटना समोर आली आहे, या प्रकरणी श्र्वानाचे मालक मोजीस डिसूजा यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, डिसूजा हे सेवानिवृत्त असून कॅम्प परिसरात दस्तूर मेहेर रोडवर वास्तव्यास आहेत. ते त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह इथे राहायला आहेत. त्यांच्याकडे सायबेरियन हस्की (Husky) प्रजातीचे श्वान ज्याचे नाव त्यांनी "मेस्सी" ठेवले होते ते पाळले होते.