Crime News : साखरपुडा झाला, काही दिवसांवर लग्न पण... हॉटेलच्या खोलीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह

Crime News : जिल्हात पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे.

Updated: Feb 13, 2023, 04:31 PM IST
Crime News : साखरपुडा झाला, काही दिवसांवर लग्न पण... हॉटेलच्या खोलीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : हॉटेलच्या (Crime News) बंद खोलीत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने यवतमाळमध्ये (Yavatmal News) खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या दत्त चौकात असलेल्या हॉटेल मकरंदमध्ये या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह (Yavatmal Police) आढळून आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मृतदेह कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला.

मंगीलाल चव्हाण असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मंगीलाल यांची नुकतीच वडगाव जंगल पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती.  त्यांचा विवाहसुद्धा ठरला होता. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र आता त्यांच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान मंगीलाल चव्हाण हे रविवारी हॉटेल मकरंदमध्ये मुक्कामी थांबला होते. मात्र सकाळी त्यांचा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृत मांगीलाल यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. दुसरीकडे मंगीलाल यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

भंडाऱ्यात विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द येथील एका 26 वर्षीय विवाहितेने स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनू बबलू शेंडे असे मृतक विवाहितेचे नाव आहे. सोनूने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

सोनू शेंडे ही गेल्या दोन तीन वर्षापासून विरली खुर्द येथे पती बबलू शेंडेसोबत राहत होती. पती बबलू शेंडे हा  बांधकामाच्या कामावर जात असल्याने तो दर आठवड्यात तीन चार दिवस गावाबाहेर राहत होता. त्यामुळे सोनू घरी एकटीच राहत होती. सोनूचे सासू सासरे हे गावातीलच दुसऱ्या घरात राहत होते. सोनू हिने रात्री घरी एकटीच असताना आपल्या राहत्या घरातील बैठक खोलीत घराच्या छताला लागलेल्या पंख्याला नायलॉन दोरी बांधून त्याच दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली.