Crime News : राहता तालुक्यातील सावळीविहीर गावात दारू विक्रीच्या कारणातून 23 वर्षीच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आशिष जाधव नामक तरुणाने बंद असलेल्या सोमया साखर कारखान्यात शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी गुरे चारणाऱ्या व्यक्तीच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ जवळच राहणाऱ्या नागरिकांना या घटनेची माहिती दिली.
शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत पुढील कार्यवाही केली. दरम्यान दारू व्यवसाय करण्याच्या कारणातून मयत तरुणावर मोठा दबाव होता दारू धंदा करू नको केल्यास हात पाय तोडू अशी धमकी मयताला दिली गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. तसेच गावातील सर्व दारूचे धंदे बंद करा अशी मागणी मयताची बहीण आई व नातेवाईकांनी पोलिसांकडे केली.
शिर्डी सह निमगाव सावळविर सोनेवाडी रुई या शिवारात दारू अड्डे तेजित सुरू आहेत. मागील काही दिवसांपूर्वी सुरू असलेले दारू अड्डे आम्ही उध्वस्त केले होते मात्र काही दिवसांनी पुन्हा दारू वाढते तयार झाले असून हे धारवाडे कायमचे नष्ट करावे पोलीस प्रशासनाला आमची विनंती असून आम्ही तुम्हाला दारू अड्डे बंद करण्यासाठी सहकार्य करू अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे केलीये.
आशिष कुटुंबाचा एकमेव आधार होता अशा दुर्दैवी प्रकरणामुळे जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दारू धंदेच्या वादातून एखाद्या तरुणाचा असा मृत्यू होणं ही पोलीस प्रशासनासाठीही शोकांतिका म्हणावी लागेल. यापूर्वीही शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत दारूच्या कारणातून असे प्रकार घडले असून दारू विक्री बाबत कारवाई न केल्याने तरणा मुलगा जग सोडून गेलाय. सावळीविहीर सह निमगाव, रुई, सोनेवाडी तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिर्डी आदी ठिकाणी दारू पुरवठा करणारा मोरक्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
या प्रकरणातही त्याचाच हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.या दुर्दैवी प्रकारानंतर तरी पोलीस शिर्डी सह पंचक्रोशीतील अवैध दारू विक्रीला आळा घालणार का हा प्रश्न निर्माण झालाय.