तरुणीचे 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, दोन संशयित ताब्यात

30 लाखांच्या खंडणीसाठी एका तरुणीचं (Young woman) अपहरण (Kidnap) झाल्याच्या शहरात एकच खळबळ उडाली.

Updated: Aug 7, 2021, 11:44 AM IST
तरुणीचे 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, दोन संशयित ताब्यात  title=

अमर काणे / नागपूर : 30 लाखांच्या खंडणीसाठी एका तरुणीचं (Young woman) अपहरण (Kidnap) झाल्याच्या शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत विविध तपास पथके तयार करत या कथित अपहरणनाट्यावर शेवट केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून तरुणी सुखरुप आहे.ऋषिकेश कोरके आणि रिकू चव्हाण असं अशी आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी तरुणी रहात असलेल्या वस्तीतीलच आहे. (Young woman Kidnapping for Rs 30 lakh ransom, two suspects in police custody)

 नागपूर शहरातील चंदननगर परिसरातील एका 19 वर्षीय तरुणी शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिच्या मोबाईलवरून वडिलांना 7.15 वाजता वडिलांना फोन आला.तुमच्या मुलीचं अपहरण केल्याच फोनवरून अपहरण कर्त्यांनी सांगितलं.तिच्या सुटेकसाठी 30 लाखांची खंडणीची मागणी केली.तरुणांनी हादरलेल्या वडिलांनी इमामवाडा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून शहरातील संपूर्ण पोलीस यंत्रणा कामी लागली. घटना घडल्याच्या अवघ्या एका तासात मुलगी सक्करदरा हद्दीत मिळून आली.त्यानंतर आरोपी ऋषिकेश कोरके  आणि चिकू चौहाण चंदननगर यांना अटक करण्यात आली. 

याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही आरोपी तरुणी रहात असलेल्या परिसरातीलच आहे.पोलिस मोठा फौजफाटा तरुणीचा शोध घेत असल्याचं आरोपिंना लक्षात आले होते. त्यामुळं त्यांनी तरुणीला सक्कदरातलाव परिसरात सोडून दिले होते. दरम्यान आरोपी आणि मुलगी एकमेकांना ओळखत होते का? तसेच अपहरणामागे दुसरे काही कारण होते, का ? या दिशेनेही आता पोलिसांचा तपास होणार आहे.