नाशिक : गंगा गोदावरीचा उगंम झाला तो त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्ह्गीरीतून, गोदावरीच्या प्रवाहाने अनेक राज्ये हिरवीगार झाली.
याचं धार्मिक महत्व असल्याने ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा करण्यासाठी शेकडो भाविक श्रद्धेने त्र्यंबकेश्वरला येतात.
तिसऱ्या श्रावण सोमवारी होणाऱ्या या प्रदक्षिणा कुंभाची छोटी फेरी वीस किलोमीटर तर मोठी प्रदक्षिणा चाळीस किलोमीटरची आहे.
ही फेरी पूर्ण करण्यसाठी महाविद्यालयीन तरुण तरुणीची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तब्बल लाखभर भाविक पावन नगरीत दाखल होतात.