स्वप्नातही वाटलं नसेल असं काही तरी होईल; गणपती मिरवणुकीत नाचत असताना तरुणाचा मृत्यू

गणेश विसर्जनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 17, 2024, 11:15 PM IST
स्वप्नातही वाटलं नसेल असं काही तरी होईल; गणपती मिरवणुकीत नाचत असताना तरुणाचा मृत्यू

Ganesh Visarjan 2024 : सर्वत्र विर्जनाचा जल्लोष पहायला मिळत आहे. वाजत गाजत गुलाल उधळत भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. परभणीत एक दुख:द घटना घडली आहे.   गणपती मिरवणुकीत नाचत असताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाला स्वप्नातही वाटलं नसेल अस काही तरी होईल. परभणीत या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

परभणी जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाचा मृत्यू झाला.  जिंतूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना तरुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.. मिरवणुकीत 3 डिजे एकत्र आल्यानं 35 वर्षीय तरुणाचा डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. संदीप विश्वनाथ कदम असं मृत तरुणाचे नाव आहे. 

परभणी जिल्ह्यात आज मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना वाजत गाजत ठिकठिकाणी निरोप देण्यात आलाय, अनेक ठिकाणी अद्याप ही मिरवणुका सुरू आहेत,. जिंतूर  तालुक्यातील चांदज येथे गावातील गणेश मंडळाचा गणपती विसर्जन करीत असतांना गावालगत असलेल्या नदीपात्रात विसर्जन सुरू असतांना गावातील भागवत कल्याण अंभुरे (१३)  हा  सातवीत शिकणारा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे.  अद्यापही हा मुलगा सापडला नसून या मुलाचा शोध सुरू आहे...
धुळे जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रॅक्टर खाली चिरडून तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तसंच सहा जण जखमी झालेत. चितोड गावात एकलव्य श्री गणेश मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्दैवी घटना घडली आहे.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More