युवराज-झहीरनं सांगितले ड्रेसिंग रूममधील किस्से

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्या वतीने हडपसर येथील अमनोरा टाऊनशीप येथे अध्याय १८ या वार्षिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Updated: Jan 9, 2018, 09:21 PM IST
युवराज-झहीरनं सांगितले ड्रेसिंग रूममधील किस्से

पुणे : रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्या वतीने हडपसर येथील अमनोरा टाऊनशीप येथे अध्याय १८ या वार्षिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने झहीर खान आणि युवराज सिंग यावेळी आपल्या मैत्रीचा आणि कारकीर्दीचा प्रवास उलगडला.

कुणाला दुखापत झाली आणि काय करावं हे सुचत नसेल तर आम्ही झहीर खानकडे जायचो. कारण तो जे सांगायचा ते योग्य असायचं. त्यामुळे आम्ही त्याला आयडीयावाला बाबा म्हणायचो असं सांगत युवराज सिंगने झहीर खानबाबत सांगितलं. झहीर खानने देखील लग्न, क्रीकेट ते व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबरचे रुम शेअरींगचे किस्से सांगितले.