'झी २४ तास' इम्पॅक्ट : म्हैसमाळमध्ये टँकरसहीत पाण्याच्या दोन टाक्या दाखल

अशा असंख्य तहानलेल्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून तातडीनं पाणीपुरवठा केला जाणार आहे पण त्यासाठी गरज आहे ती... 

Updated: May 10, 2019, 09:41 AM IST
'झी २४ तास' इम्पॅक्ट : म्हैसमाळमध्ये टँकरसहीत पाण्याच्या दोन टाक्या दाखल title=

योगेश खरे, झी २४ तास, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ गावात विहिरीत खोल उतरून महिलांची पाण्यासाठीची पायपीट 'झी २४ तास' दाखवली होती आता या गावात पाण्याचा टँकर येऊ लागला असून पाण्याच्या टाक्या ही बसवण्यात आले आहेत स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी 'झी २४ तास'च्या वृत्ताची दखल घेत तातडीने कारवाई करत लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवलाय..

म्हैसमाळ गावातील महिलांची पाण्यासाठीची जीवघेणी कसरत 'झी २४ तास'नं मांडली आणि त्यानंतर प्रशासनाची एकच धावपळ सुरू झाली. 'झी २४ तास'च्या बातमीची दखल घेत तातडीनं या गावात टँकरनं पाणीपुरवठा सुरु करण्यात आलाय. इतकंच नाही तर पाण्यासाठी महिलांना विहिरीत उतरावं लागू नये म्हणून पाण्याच्या दोन टाक्याही बसवण्यात आल्यात. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हैसमाळ गावातील पाणीबाणी दूर केली आहे. 

Image
म्हैसमाळ, नाशिक

'झी २४ तास'च्या एका बातमीमुळे म्हैसमाळच्या गावकऱ्यांचा गेल्या चार दशकांचा जीवघेणा दुष्काळ आता संपलाय. त्यामुळे या गावकऱ्यांनी 'झी २४ तास'चे आभार मानलेत. 

बड्याचा पाढा आणि त्यानंतर म्हैसमाळ ही दोन्ही तहानलेली गावं आज तृप्त झालीत. अशा असंख्य तहानलेल्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून तातडीनं पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी गरज आहे ग्रामपंचायत आणि सरपंचांनी तहसीलदार आणि जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधण्याची...