अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: शाळकरी मुलांसाठी शिक्षक (Teacher) हे आदर्श असतात त्यामुळे त्यांच्यासाठी कायमच शिक्षकांना आधार आणि मार्गदर्शक (Teacher - Student Relationships) करणे बंधनकारक आणि जबाबदारीचे काम ठरते. परंतु सध्या अशाच एका प्रकारानं सगळ्यांनाच धक्का (Shocking News) बसला आहे. मुलांसमोर शाळेत काय आदर्श घडतायत यामुळे शिक्षकांचे पालकही (Parents) त्रस्त आहेत. शाळेत लहान मुलांना चांगले आदर्श (Role Models) मिळावेत म्हणून पालक त्यांच्या लहान मुलांना शाळेत शिकवायला पाठवतात परंतु अशा या घटनेमुळे मात्र आता लहान मुलांना (Childrens) शाळेतही कसं पाठवायचं असा प्रश्न पालकांना पडू शकतो.
मेळघाट (Melghat) नेहमीच या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत असते यातच मेळघातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गखोलीतच मुख्याध्यापक दारू पिऊन झोपलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला मेळघाटातील काटकुंभ (Drunk Teacher) येथील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार असून दारू पिऊन वर्ग खोलीत झोपला असलेल्या अवस्थेत विद्यार्थ्यांनी या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ काढला (Videos) असून वर्गखोली बाहेरच शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर लघुशंका केल्याचेही पाहायला मिळाले आहे. अविनाश राजनकर असं मद्यप्राशन केलेल्या मुख्याध्यापकाचे नावं असून अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे तसेच दारुड्या मुख्याध्यापकावर कारवाईसाठी जिल्हा परिषद सीईओकडे ग्रामस्थांनी तक्रार केल्याची माहिती आहे.
याआधीही अमरावतीत (Amravati News) असा प्रकार घडला आहे. काकरमल येथे असा एक धक्कादायक प्रकार घडला होता. शाळाला सुट्टी देऊन शिक्षक दादागिरी करू लागला होता. त्यानंतर शाळेच्या वर्गात कोणीही नसल्यानं हा शिक्षक दारू पिऊन तिथेच झोपून गेला आणि दारू पिऊन त्यानंही तिथेच लघूशंका केली होती. हा प्रकार शाळेतील महत्त्वाच्या व्यक्तींना कळल्यानंतर मात्र त्यानं योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि या शिक्षकाचा चांगलाच समाचार घेतला परंतु त्यानं कोणाचंही न ऐकता पालकांवरतीच दादागिरी करायला सुरूवात केली. या सर्व प्रकाराचा तिथल्या लोकांनी व्हिडीओही (Video Shoot) शूट केला होता तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
सध्या असे प्रकार अनेकदा घडताना दिसत आहेत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षितेतचा प्रश्न उपस्थित झाला आहे. असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे लहान मुलांना योग्यप्रकार शाळेत घालणं आणि त्यांना सुरक्षित घरी परत आणणं यासाठी पालकांची जबाबदारी वाढली आहे. मद्य प्राशन करून शाळेतच शिक्षकच असा गलिच्छ प्रकार करतात यामुळे शाळेचेही नावं खराब होऊ लागले आहे आणि त्यामुळे याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवरही होऊ शकतो.