Solapur News: माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, परपुरूषानं बायकोला पाहू नये म्हणून तिचे केसचं कापले

ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी ही काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळी उघडकीस (Shocking News) आली. हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही (Police) ऐकून थक्क झाले.

Updated: Nov 23, 2022, 11:52 AM IST
Solapur News: माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, परपुरूषानं बायकोला पाहू नये म्हणून तिचे केसचं कापले title=

अहेमद शेख, झी मीडिया, सोलापूर: सोलापुरात (Solapur News) एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत क्रूरकृत्य केल्याचे समोर आलेय. परपुरुषाने आपल्या पत्नीकडे पाहू नये यासाठी पतीने चक्क नाभिकाला बोलावून 20 वर्षीय पत्नी पत्नीचे टक्कल केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी ही काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळी उघडकीस (Shocking News) आली. हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही (Police) ऐकून थक्क झाले. (wifes hair cut so as not to be seen by strangers husband called cutter directly at home)

पीडितेचा विवाह जोडबसवण्णा चौकातील कलीम चौधरी या तरुणाशी मे महिन्यात झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनीच पतीने पीडिते वर संशय घेण्यास सुरुवात केली. सासरकडील मंडळी हार बनवण्याचा व्यवसाय करत असून सगळेजण तिला एकटीला घरी कोंडून व्यवसायासाठी जात होते. तरीही तिच्यावर नवरा संशय घेत होता. यातूनच पीडितेच्या पतीने संशय घेत तिला तुझे केस मला आवडत नाहीत, असे म्हणत हिला केस काढून टक्कल करायचे असल्याचे सांगितले. हे ऐकताच तिने साफ नकार दिला; पण त्यानंतर पतीने रागाच्या भरात तिच्याशी न बोलणे ,जेवण न करणे मारहाण करणे अशी वागणूक सुरु केली. यामुळे पीडितीने मनावर दगड ठेवून केस कापण्यास होकार दिला. केस कापण्यासाठी आल्यानंतरही त्यावेळी अगोदर विरोध केला नंतर ती नाईलाजाने शांत राहिली, अशी माहिती पीडितेच्या आईवडिलांनी (Mother-Father) दिलीय. 

दरम्यान, पीडितेच्या पतीने बाहेरून नाभिकाला बोलावून पत्नीचे केस पूर्णतः काढून टाकले. हा प्रकार पीडितेने आपल्या माहेरी सांगितला नाही. काही दिवसानंतर माहेरच्या लोकांनी कार्यक्रमानिमित्त पीडितेला व जावयाला घरी बोलावले. त्यावेळी पतीने पीडित सुमय्याला घरी नेऊन सोडले. त्यावेळी पीडितेने आपल्याबरोबर झालेली घटना आई-वडिलांना सांगितली. यानंतर तरीही पीडितेच्या आई-वडिलांनी मुलीला सासरी नांदविण्यासाठी घेऊन जातील असे वाटून याची तक्रार केली नाही. पण 22 दिवसानंतरही पडितेची पतीने पीडितेच्या कुटुंबीयांचे (Family) फोन घेणे टाळले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्यासाठी जेलरोड पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पीडिता जेव्हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेली होती तिच्या डोक्यावर थोडे केस आलेले दिसून येत होते.