बैलांना आंघोळ घालायला गेले आणि नदीत बुडाले

नवनाथ गवळी यांचा तलावात बुडून मृत्यू झाला.

Updated: Sep 9, 2018, 07:18 PM IST
बैलांना आंघोळ घालायला गेले आणि नदीत बुडाले

औरंगाबाद: बैलपोळ्याच्या सणासाठी बैलांना सजवण्यापूर्वी त्यांना नदीवर आंघोळ घालायला गेलेल्या चार तरुणांचा विविध घटनांमध्ये बुडून मृत्यू झाला. 

कन्नड तालुक्यतील अंधानेर गावात कैलास बाविस्कर याचा अंबाडी प्रकल्पात बुडून  मृत्यू झाला. तर चांभारवाडी येथे नवनाथ गवळी यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. याशिवाय वैजापूर तालुक्यात वीरगाव येथे दोन सख्खे भाऊ बुडून मरण पावले. अमोल रायते आणि ऋषिकेश रायते अशी त्यांची नावे आहेत. 

Tags: