मोदींना सवाल, हेच का अच्छे दिन? - शिवसेना

शिवसेनेनं इंधन दरवाढ विरोधात आंदोलन 

Updated: Sep 8, 2018, 11:00 PM IST
मोदींना सवाल, हेच का अच्छे दिन? - शिवसेना

औरंगाबाद : पेट्रोल दरवाढ विरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेनं अनोखं आंदोलन केलं. पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावले आहेत त्याच्याच बाजूला, शिवसेनेनं पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीचे बॅनर लावून  हेच का अच्छे दिन? असा सवाल सरकारला केला. 

शहरातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर अशाच प्रकारचे बॅनर लावून इंधन दरवाढीचा शिवसेनेनं निषेध केला. एवढ्यावरच न थांबता लोकांशी संवाद साधून भाजपा सरकारच्या काळामध्ये इंधनाचे दर कशा पद्धतीने वाढत आहेत हे सांगत, शिवसेनेनं इंधन दरवाढ विरोधात आंदोलन केलं.