Aurangabad Lockdown : औरंगाबादमध्ये ३० मार्चपासून लॉकडाऊन...पाहा काय आहेत नियम

महाराष्ट्रातील आताची सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. औरंगाबादमध्ये ३० मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. 

Updated: Mar 27, 2021, 07:18 PM IST
Aurangabad Lockdown : औरंगाबादमध्ये ३० मार्चपासून लॉकडाऊन...पाहा काय आहेत नियम title=

मुंबई : महाराष्ट्रातील आताची सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. औरंगाबादमध्ये ३० मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. ३० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत हा लॉकडाऊन लागू असेल. 

लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने, दूध, भाजी देखील दुपारी १२ पर्यंतच उपलब्ध होणार आहे. त्यानंतर मात्र सर्व गोष्टी बंद केल्या जातील. मात्र या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. 

नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसले, तर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. उद्योगांना मात्र या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेली आहे. 

औरंगाबादमध्ये दिवसाला अठराशेहून अधिक कोरोना रुग्ण आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. याआधी अंशत: लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केलेला, मात्र त्यानेही रुग्णसंख्या नियंत्रणात न आल्याने आता पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात ाला आहे.