गुन्हेगार इमरान मेहंदीच्या पलायनाचा कट पोलिसांनी उधळला

मध्य प्रदेशातील १० जणांच्या टोळीकडे हे काम सोपवण्यात आले होते. 

Updated: Aug 27, 2018, 11:51 PM IST
गुन्हेगार इमरान मेहंदीच्या पलायनाचा कट पोलिसांनी उधळला

औरंगाबाद: माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्याकांड प्रकरणातील गुन्हेगार आणि सुपारी किलर इमरान मेहंदीला न्यायालयात नेण्यापूर्वीच पळवून नेण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. 

पोलिसांच्या ताफ्यात घुसून इमरानची सुटका करण्याचा कट आखण्यात आला होता. मध्य प्रदेशातील १० जणांच्या टोळीकडे हे काम सोपवण्यात आले होते. पोलिसांच्या व्हॅनला तवेरा, सँट्रो आणि मोटर सायकलनं घेरून सशस्त्र हल्ला करण्याचा कट होता. मात्र, पोलिसांना वेळीच या कटाचा सुगावा लागल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. 

हा कट आखणाऱ्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या टोळीमधील सात जण शार्प शूटर असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.