अंधेरीतील मित्तल इस्टेटमध्ये गोदामाला आग

अंधेरी परिसरातील मित्तल इस्टेटमधील गोदामाला आग लागली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 15, 2018, 07:49 AM IST
अंधेरीतील मित्तल इस्टेटमध्ये गोदामाला आग

 मुंबई : अंधेरी परिसरातील मित्तल इस्टेटमधील गोदामाला आग लागली आहे. 

या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आगे. आग का लागली याचे अद्याप कारण कळलेले नाही. असं सांगितलं जातं आहे की, ही आग त्या इमारतीत असलेल्या प्रिटिंग प्रेसला लागली आहे. आतापर्यंत या आगीत मृत्यू झालेल्या त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. 

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. पोलीस या प्रकाराची चौकशी करत आहेत. या अगोदर मुंबईतील कमला मिलमध्ये आग लागली होती. या आगीत जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला होता. पबमध्ये लागलेल्या आगीमुळे ही घटना घडली अशी माहिती मिळाली आहे. 

मुंबईत गेल्या कित्येक दिवसांपासून आगीच सत्र सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत आहे.