मुंबईत अब्रू वाचविण्यासाठी १२ वर्षीय मुलीची इमारतीवरुन उडी

पत्ता विचारण्याचा बाहाणा करुन इमारतीच्या गच्चीवरुन एका १२ वर्षीय मुलीला नेले. मात्र, ३५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीने या अल्पवयीन मुलीचे छेड काढण्यास सुरुवात केले. त्याने थेट कपड्यांना हात घातल्याने मुलीने आपली अब्रू वाचविण्यासाठी चार मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारली. ही घटना नालासोपारा येथील अलकापुरी येथे घडली.

Surendra Gangan Updated: Apr 6, 2018, 01:50 PM IST
मुंबईत अब्रू वाचविण्यासाठी १२ वर्षीय मुलीची इमारतीवरुन उडी title=

मुंबई : पत्ता विचारण्याचा बाहाणा करुन इमारतीच्या गच्चीवरुन एका १२ वर्षीय मुलीला नेले. मात्र, ३५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीने या अल्पवयीन मुलीचे छेड काढण्यास सुरुवात केले. त्याने थेट कपड्यांना हात घातल्याने मुलीने आपली अब्रू वाचविण्यासाठी चार मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारली. ही घटना नालासोपारा येथील अलकापुरी येथे घडली.

इमारतीवरुन उडी मारणारी अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. याप्रकरणी तुलिंज पोलीस ठाण्यात छेडछाड आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपहरण, विनयभंग आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ही घटना ३ एप्रिल रोजी ही घटना घडली असून पीडित मुलीवर मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या कंबरचे हाड मोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. नालासोपारा पूर्व अलकापुरी या परिसरात ही पीडित मुलगी पायी फुटपाथवरून  सकाळी आकराच्या सुमारास  जात होती. याचवेळी एक ३५ वर्षांचा व्यक्ती मोटारसायकलवरुन आली. या व्यक्तीने आपल्याकडील कागद देऊन पत्ता विचारला. मुलीने तो पत्ता सांगितला. मात्र, मला ठिकाण दाखव, असे सांगत तिला सोबत घेतले. सुरज अपार्टमेंट या इमारतीच्या टेरेस वर घेऊन जात होता. तेव्हा मुलीने मुझे कहा लेके जा रहे हो, असे विचारले. मात्र, तिचे काहीही ऐकूण न घेता तिला जबरदस्तीने टेरेसवर नेले आणि छेडछाड करण्यास सुरुवात केली.

पीडीत मुलीशी ही व्यक्ती अश्लील चाळे करु लागली.  त्यानंतर मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्नही करत होता. तेव्हा मुलीने आरडाओरडा करून चक्क स्वत:ची इज्जत  वाचविण्यासाठी इमारतीवरुन उडी मारली. पण मुलीच्या आरडाओरडा ऐकूण स्थानिक राहिवाशी गोळा झालेत. त्याचवेळी मुलगी इमारतीवरुन उडी मारत असल्याचे लक्षात येताच काहींनी सोबत चादर आणली. त्या मुलीला चादरीत झेलले आणि जीव वाचवला. मुलीला चादरीत झेलल्याने तिचा जीव वाचलापण तिच्या कंबरेला गंभीर दुखापत होऊन हाड मोडले.