कोरेगाव भीमा प्रकरणातील ३४८ तर मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे

कोरेगाव भीमा प्रकरणातील आणि मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेतल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली. 

Updated: Feb 27, 2020, 06:21 PM IST
कोरेगाव भीमा प्रकरणातील ३४८ तर मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे
संग्रहित छाया

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणातील (koregaon Bhima case) ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तसेच मराठा आंदोलनातील (Maratha agitation) ४६० गुन्हे मागे घेतल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत केली. देशमुख यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. तसेच शेतकरी आंदोलनातीलही गुन्हेही लवकरच मागे घेण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी दिले.

कोरेगाव भीमी प्रकरणातील काही गुन्हे याआधी मागे घेण्यात आले होते. ६४९ गुन्हांपैकी ३४८ गुन्हे हे मागे घेण्यात आले आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन करण्यात आले होते. काही ठिकाणी आंदोलनाच्यावेळी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ५४८ गुन्ह्यांपैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. दरम्यान, उर्वरित काही गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

दरम्यान, कोकणातील राजापूर येथील नाणार आंदोलनातील तीन गुन्हे मागे घेण्यात आले आहे. तसेच शेतकरी आंदोलनातीलही गुन्हे देखील लवकरच मागे घेतले जातील, अशी माहीती यावेळी अनिल देशमुख यांनी दिली.

0