राज्यात आज कोरोनाचे 5,229 रुग्ण वाढले, 127 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज  6,776 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

Updated: Dec 4, 2020, 08:05 PM IST
राज्यात आज कोरोनाचे 5,229 रुग्ण वाढले, 127 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात आज कोरोनाचे 5,229 नवीन रुग्ण वाढले असून 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 6,776 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 18,42,587 वर पोहोचली असून आतापर्यंत 17,10,050 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत राज्यातील 47,599 जणांनी आपला जीव गमवला आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे 83,859 रुग्ण सक्रीय आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण आता 92.81 टक्के झालं आहे. तर मृत्यूदर हा 2.58 टक्के इतका आहे.

आतापर्यंत राज्यात 1,11,32,231 जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी 18,42,587 जणं पॉझिटिव्ह आले आहेत. 

राज्यात सध्या 5,47,504 जण होम क्वारंटाईन असून 5567 लोकं हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.