5G | देशासह राज्यातील या शहरात लवकरच सुरू होणार 5G सेवा

पुढच्या वर्षी म्हणजे 2022मध्ये काही शहरांत 5जी सेवा मिळणार आहे. 

Updated: Dec 28, 2021, 09:32 AM IST
5G | देशासह राज्यातील या शहरात लवकरच सुरू होणार 5G सेवा title=

मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजे 2022मध्ये काही शहरांत 5जी सेवा मिळणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटची गती आणखी वाढणार आहे. भारतातील डिजिटल क्रांतीला आणखी बळ मिळणार आहे. 

मुंबई, गुरूग्राम, बंगळुरू, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याला सर्वात आधी 5जी सेवा मिळेल. 

त्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये स्पेक्ट्रम लिलाव जाहीर होईल. त्यानंतर सेवा सुरु होईल.