मुलूंड : नऊ फुटाच्या अजगराला मिळाले जीवनदान...
मुलुंड आणि नाहूरमधल्या कंटेनर यार्ड मध्ये शनिवारी संध्याकाळी सर्पमित्रांनी साडे नऊ फुटाच्या अजगराला जीवनदान दिले. हा अजगर मुलुंड गोरेगाव ओलंडण्याच्या प्रयत्नात होता. त्या वेळेला त्या ठिकाणावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने सेव्ह वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशनच्या सदस्यांना याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारावर संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन अजगराच्या शोध घेतून त्याला यशस्वीरीत्या वाचविले. हा अजगर इंडियन रॉक पायथॉन या प्रजातीचा असून त्याची लांबी साडेनऊ फुटाची आहे.मुलुंड परिसरात वारंवार जंगली प्राणी , आणि सर्प आढळून येत असल्याने इथल्या नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.