Mumbai Crime: इतके दिवस त्यानं तिला 'पत्नी' म्हणून सांभाळलं परंतु ती 'ती' नव्हतीच?

Mumbai : हा प्रकार मुंबईसारख्या शहरात घडला आहे. सध्या या बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. हल्ली लग्नाच्या हनिमूनच्या रात्रीचं नवरीचं ते रूप पाहून मोठ्या खुलासा होत एकच खळबळ उडते असाच एक प्रकार एका तरूणासोबत घडल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Updated: Feb 8, 2023, 08:40 PM IST
Mumbai Crime: इतके दिवस त्यानं तिला 'पत्नी' म्हणून सांभाळलं परंतु ती 'ती' नव्हतीच?

Mumbai Marriage Scandal: हल्ली लग्नसभारंभामध्येही अनेक प्रकारचे गैरप्रकार पाहायला मिळतात. त्यातून लग्नातील फसवेगिरीही (Frauds in Marriages) वाढू लागली आहे त्यातून हनिमूनच्या रात्रीचं बऱ्याच गंभीर घटना घडताना दिसत आहेत. सध्या अशीच एक बातमी समोर येते आहे आणि ती म्हणजे मुंबई एका जोडप्याच्या हनिमूनच्या दिवशी तो जेव्हा ती निघाला तेव्हा नवऱ्याला आधी धक्का बसला आणि तिनं जेव्हा त्याला ब्लॅकमेल केलं तेव्हा मात्र गप्प राहिला परंतु शेवटी त्यालाही त्याच्या कुटुंबियांनी ही धक्कादायक बातमी सांगावीच लागली. हा प्रकार मुंबईसारख्या (Mumbai Crime) ठिकाणी घडला आहे. एका तरूणावर चक्क आपल्या लग्न केल्यानंतर पाश्चात्तापाची वेळ आली आहे. एका घटनेनं मात्र त्याच्या आयुष्याची पार राख रांगोळी झाली आहे. 

हा प्रकार मुंबईसारख्या शहरात घडला आहे. सध्या या बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. हल्ली लग्नाच्या हनिमूनच्या रात्रीचं नवरीचं ते रूप पाहून मोठ्या खुलासा होत एकच खळबळ उडते असाच एक प्रकार एका तरूणासोबत घडल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे, त्याच्यासकट त्याच्या कुटुंबियांनाही आश्चर्याचा जबर धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांचा तो हनिमून पहिला आणि शेवटचा ठरला. परंतु नक्की काय घडलं त्या रात्री? 

इतकी वर्षे जिला डेट (Dating) केलं, जिच्यावर प्रेम केलं तिच आपली प्रेयसी ठरली पुरूष... हे ऐकून एका व्यक्तीला जबर धक्का बसला आहे. हा तरूण आपल्या आयुष्यात असंही काही घडेल हे ऐकून त्याला त्या घटनेवर विश्वासही बसला नसेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार या दोघांची भेट कॉलेजमध्ये झाली. 

त्यानंतर भेटीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मग त्यानंतर त्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. त्यांचे प्रेम हे इतके वाढत गेले त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर शेवटी घरच्यांनीही त्यांच्या लग्नाला होकार दिला. त्यांचे लग्न 25 जानेवारीला झाले, मग त्या लग्नाच्या रात्री त्या नवरीनं आपल्या पोटात दुखत असल्याचे त्याला सांगितले आपल्याला हर्निया असल्याचे तिने सांगितले. परंतु तरी तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु ती मात्र त्याला आपल्या जवळ येऊ देत नव्हती या प्रकारानं मात्र त्याला तिच्यावर संशय आला आणि मग त्यानं तिला हनिमूनला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. तेव्हा मात्र जे त्याच्या दृष्टीनं होयला नको होतं तेच झालं. आपल्या पत्नी स्त्री नसून पुरूष असल्याचे त्याला समजले आणि त्याच्या पायाखालची जमिनचं सरकली. 

पण या पुरूषानं त्याला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली आणि मग त्यानं याबाबत कुठेही काहीही बोलायचे नाही अशी धमकी दिली. त्यानंतर त्याला नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेवटी खरं काय ते सांगावंच लागले आणि त्यानंतर त्याच्या सहनशक्तीचा शेवटी अंत झाला आणि त्याला खरं काय ते सांगावे लागले. त्यानं रडत रडत या सगळ्या गोष्टी आपल्या घरच्यांना सांगितल्या. त्यानंतर मुलाच्या वैद्यकीय चाचणीची त्याच्या घरच्यांनी मागणी केली आणि शेवटी त्याच्या घटस्फोटाचीही. सध्या पोलिस हा प्रकार का आणि कसा घडला याबद्दल तपास करत आहेत.