Crime News : मुंबईत गँगस्टर छोटा राजनचा Birthday सेलिब्रेट करणारा ठाकरे गटाचा पदाधिकारी

कुख्यात गुंड छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणं निलेश पराडकरला चांगलंच भोवलंय. पराडकरच्या अटकेनंतर 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. पराडकर हा ठाकरे गटाचा नवी मुंबईचे संपर्कप्रमुख आहे. 

Updated: Jan 15, 2023, 08:39 PM IST
Crime News :  मुंबईत गँगस्टर छोटा राजनचा Birthday सेलिब्रेट करणारा ठाकरे गटाचा पदाधिकारी title=

Chhota Rajan Poster : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Gangster Chhota Rajan) याच्या वाढदिवस मुंबईत सेलिब्रेट करण्यात आला. छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणारा  ठाकरे गटाचा पदाधिकारी निघाला आहे. पोलिसांनी या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय. नंतर पोलिसांनी शुभेच्छा देणारे पोस्टरही काढून टाकले.

काय आहे नेमका प्रकार

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबईत कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. तसे पोस्टर लागले होते. मालाडच्या तानाजी नगरमधल्या गणेश मैदान कुरार व्हिलेज येथे हे भव्य पोस्टर लावण्यात आले होते. छोटा राजन उर्फ नाना यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य कबड्डी स्पर्धा असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं होते. सीआर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली. या पोस्टरवर छोटा राजनचा मोठा फोटोही छापण्यात आला होता. या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसांनी कारवाई करत पोस्टर हटवले तसेच पोस्टर लावणाऱ्यांना ताब्यात घेतले. 

वाढदिवस साजरा करणं चांगलंच भोवल

या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  कुख्यात गुंड छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणं निलेश पराडकरला चांगलंच भोवलंय. पराडकरच्या अटकेनंतर 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. पराडकर हा ठाकरे गटाचा नवी मुंबईचे संपर्कप्रमुख आहे. पराडकरला 7 दिवस टिळकनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट आहे. तसेच पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

कुख्यात गुंड छोटा राजनच्या नावानं मुंबईत खंडणी वसुली 

कुख्यात गुंड छोटा राजनच्या नावानं मुंबईत खंडणी वसुली सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. कुरार पोलिसांनी 6 खंडणीखोरांना बेड्या टोकल्यात. या आरोपींकडील खंडणी वसुली केल्याची पेमेंट स्लीप पोलिसांच्या हाती लागलीय. या पेमेंट स्लीपवरून खंडणी वसूल केल्याचं स्पष्ट झालंय. छोटा राजनच्या वाढदिवासानिमित्त मुंबईत बॅनर लागली होती. आता खंडणी वसुलीची माहिती समोर येतेय. मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड डोकं वर काढतंय की काय अशी भीती व्यक्त केली जातेय.

मुंबईत छोटा राजनची दहशत

2015 मध्ये छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यात आली त्यानंतर त्याला भारताकडे सुपूर्द करण्यात आलं. 55 वर्षीय छोटा राजन हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी (Most Wanted Criminal) एक आहे. दोन दशकांपासून तो सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देत होता. छोटा राजनचं खरं नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असं आहे.