मुस्लिम महिलांकडून गणपतीची आरती

मुंबईत एँटॉप हिल इथं आमदार तामिळ सेल्वन यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं.

Updated: Sep 4, 2017, 02:36 PM IST
मुस्लिम महिलांकडून गणपतीची आरती title=

मुंबई : मुंबईत एँटॉप हिल इथं आमदार तामिळ सेल्वन यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं. मामा काणे नगर इथंल्या बिल्डिंग नंबर 52 इथंल्या गणपतीची मुस्लिम महिलांनी गणपतीची आरती केली. 

न्यायालयानं दिलेल्या तीन तलाकच्या निर्णयाचं यावेळी मुस्लिम महिलांनी स्वागत करत या निर्णयासाठी बाप्पाचे आभारही मानले. 

सुप्रीम कोर्टाने 18 महिन्यानंतर तीन तलाकवर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. साधारण हजार वर्षांची प्रथा या निर्णयाने मोडीत निघाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने 3:2 अशा बहुमताने हा निर्णय दिला आहे. त्यात म्हटले आहे, की तीन तलाक वॉइड (शून्य), असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहे.