मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, दोन ठार

जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. 

Updated: Jan 10, 2018, 08:28 AM IST
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, दोन ठार title=

लोणावळा : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. 

कंटेनर आणि इको स्पोर्टमध्ये धडक

जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वडगाव मावळ येथे ब्राम्हणवाडी फाट्यावर कंटेनर आणि इको स्पोर्टमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

वडगांव मावळ पोलिसांकडे तपास

घटनास्थळी अँम्ब्युलन्स सह वडगांव मावळ पोलिसांनी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केलं. यात मृत आणि जखमींची ओळख अद्यापी पटली नाहीये. वडगांव मावळ पोलीस अधिक तपास करीत आहे.