अयोध्येच्या राममंदिरावरून हेमंत ढोमेंची उद्धव ठाकरेंवर टीका

काय म्हणाले हेमंत ढोमे 

अयोध्येच्या राममंदिरावरून हेमंत ढोमेंची उद्धव ठाकरेंवर टीका  title=

मुंबई : निवडणूकांच्या अगोदर पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न उभा ठाकला आहे. येत्या दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित केला आहे. तर विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटनेंमार्फत राममंदिराचा मुद्दा तापू लागला आहे. असं असनेता अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांना उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 

शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झाले. पण त्या अगोदर हेमंत ढोमेंना काही प्रश्न पडले आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये हे मंदिर बांधून दुष्काळ मिटेल का? आत्महत्या थांबतील का? गरिबी नष्ट होईल का? यांसारखे अनेक प्रश्न विचारले आहेत. 

या दोन ट्विटच्या माध्यमातून हेमंत ढोमे यांनी काही मुद्दे अधोरेखित केले आहेत. हेमंत ढोमे हे अनेकदा आपली मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी स्मारकासंदर्भातही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. तसेच हेमंत ढोमे यांचा 'बघतोस काय मुजरा कर' हा सिनेमा देखील अतिशय गाजला.

 छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि त्यांनी बांधलेले किल्ले ही महाराष्ट्राची अभिमान स्थळं. पण महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक वैभवाकडे तरुणाईचं होणारं दुर्लक्ष होतं आहे हा विषय  या सिनेमातून अधोरेखित केला गेला आहे.