मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांची गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरू आहे. तनुश्री दत्ताने वेळोवेळी याविषयी आपली बाजू मांडली आहे. मात्र, आतापर्यंत नाना पाटेकर या सर्व प्रकरणात मौन बाळगून होते. परंतु, अखेर प्रसारमाध्यमांनी शुक्रवारी नाना पाटेकर यांना विमातळावर गाठत प्रश्नांची सरबत्ती करायला सुरुवात केली.
यावेळी नाना पाटेकर यांनी म्हटले की, मी यापूर्वीच याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. जे खोटं आहे ते खोटंच आहे, असे नाना पाटेकर यांनी म्हटले. मात्र, या प्रकरणात दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा प्रश्न यावेळी पत्रकारांकडून विचारण्यात आला. तेव्हा नाना पाटेकर यांनी अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
तनुश्रीने नानांवर केलेल्या आरोपांमुळे बॉलीवूड इंडस्ट्रीत मोठी खळबळ माजली होती. तनुश्री विरुद्ध नाना हा वाद रंगला असतानाच बॉलिवूडमध्ये दोन गट तयार झाले आहेत. एक गट तनुश्रीच्या तर एक नानांच्या पाठीशी आहे. तनुश्रीने फक्त आरोप करण्याऐवजी पुरावे सादर करावे असे काहींचे म्हणणे आहे. तर तनुश्रीने न घाबरता याविरोधात लढा दिला पाहिजे, असे सांगत काही सेलिब्रिटींनी तनुश्रीला पाठिंबा दिला आहे.
#WATCH: Actor #NanaPatekar reacts on #TanushreeDutta's allegations against him, says 'Jo jhhooth hai wo jhhooth hi hai." pic.twitter.com/Kg8RITtY3z
— ANI (@ANI) October 6, 2018