Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED)ताब्यात घेतलं आहे. राऊत यांना ईडीने नऊ तासांच्या चौकशीनंतर अखेर ताब्यात घेतलं आहे. यानंतर संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात घेऊन जाण्यात आलं आहे. मात्र सकाळी चौकशी सुरु झाल्यापासून शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात संजय राऊतांच्या बंगल्याबाहेर गर्दी केली होती.
संजय राऊत यांना चौकशीनंतर ईडी कार्यालयात नेण्यात आलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शिवसैनिकांची धरपकड केली आहे.
#WATCH | Mumbai: Shiv Sena leader Sanjay Raut being taken by ED officials along with them after he was detained in connection with Patra Chawl land scam case from his residence pic.twitter.com/VtjjuQJhxM
— ANI (@ANI) July 31, 2022
ईडी कार्यालयात जाण्याआधी संजय राऊत यांनी घराबाहेर पडल्यानंतर हात उंचावत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसैनिकांनीही त्याला दाद देत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यानंतर कारवाई करत शिवसैनिकांना ताब्यात घेतलं.