मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड आज झाली. घाईगडबडीत आलेल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त हाती आले आहे. त्यानंतर राजकारणातील सत्ताचक्र फिरले आहे. भाजपकडे बहुमत नसल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घडामोडी ठरल्यात त्यात आजची ही सर्वात मोठी घटना आहे. त्यानंतर महाविकासआघाडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याशी आमच्याशी संवाद झाला आहे. ते आमच्यासोबत आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे.
अजित पवारांशी आमचा संपर्क झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. अजित पवार यांनी परत यावे यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील अशा दिग्गज नेत्यांनी त्यांची भेट घेतली. अखेर अजित पवारांची मनधरणी करण्यास राष्ट्रवादीला यश आल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात एका रात्रीत चक्र फिरली आणि शनिवारी सकाळी सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचा आज सकाळी आला. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणाऱ्या फडणवीस सरकारवरला उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे स्पष्ट केले. गुप्त मतदान न घेता खुल्या पद्धतीने आणि व्हिडिओ चित्रिकरण करण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी राजकीय घडामोडींना वेग आला. अचनाक अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.