Breaking : 'या' तारखेपासून मुंबईत दुकानं सर्व दिवस सुरु राहणार

सम- विषम नियम रद्द   

Updated: Aug 3, 2020, 06:33 PM IST
Breaking : 'या' तारखेपासून मुंबईत दुकानं सर्व दिवस सुरु राहणार
संग्रहित छायाचित्र

मुंबई : coronavirus कोरोना व्हायरसच्या सुरु करण्याचा निर्णय़ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे. मुंबई मुपाच्या आयुक्तांनी याबाबतचे आदेश दिले आहे. परिणामी ५ ऑगस्टपासून शहरातीस सर्व दुकानं आठवडाभर म्हणजेच सातही दिवस सुरु राहणार आहे. 

दुकानं सुरु राहण्यासोबतच मुंबईत काऊंटरवर दारू विक्रीही सुरु होणार होणार आहे. सम- विषमचे सर्व नियम रद्द करण्यात आले असून, आता अनलॉकच्या प्रक्रियेचा हा नवा टप्पा शहरात सुरु होणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाचा वाढता संसर्ग हा मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे. शिवाय रुग्णसंख्या वाढीचा कालावधीही वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढण्याच्या वेगात लक्षणीय घट आल्यामुळं हे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नाना आलेलं यश असल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यात लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या. या अंतर्गत काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून ५ ऑगस्ट २०२० पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली. तसंच खेळाडूंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून ५ ऑगस्टपासून संमती देण्यात आली आहे.