'समर्थना'साठी अमित शाह घेणार उद्धव ठाकरेंची भेट

'संपर्क फॉर समर्थन' अशी मोहीम भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सुरू केली आहे.

Updated: Jun 5, 2018, 08:13 AM IST
'समर्थना'साठी अमित शाह घेणार उद्धव ठाकरेंची भेट  title=

मुंबई : अमित शाह घेणार उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.. अमित शाह उद्या मुंबईत आहेत.. या दौऱ्यादरम्यान ते मातोश्रीवर जाऊन उद्ध ठाकरेंची भेट घेणार आहे.. या भेटीदरम्यान आगामी निवडणुकीसाठी सेना-भाजप युतीची चर्चा होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

अमित शाह मोहिमेवर 

'संपर्क फॉर समर्थन' अशी मोहीम भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अमित शाह उद्या संध्याकाळी ६.०० वाजता मातोश्रीला जात शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेणार आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचेच सरकार येईल, अशी घोषणा अमित शाह यांनी मुंबईच्या भाजप महामेळाव्यात केली होती. म्हणजेच स्वबळावर सत्तेत येण्याची भाजपाची खुमखुमी उतरली होती आणि मित्र पक्षांना बरोबर घेण्याची भाजपाची भाषा सुरू झाली होती. याचाच एक भाग म्हणून भाजपाचे समर्थन वाढवण्याचा एक भाग म्हणून अमित शाह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं समजतंय.  


२०१४ च्या निवडणुकीनंतर...

शिवसेनेचे लांगुनचालन?

मुद्दा हा आहे की, यापुढच्या निवडणुकांमध्ये भाजपाबरोबर युती करणार नाही असं जाहीर केलेल्या उद्धव ठाकरे यांचे मन वळवण्यात अमित शाह किती यशस्वी ठरतात? अमित शाह यांच्या भेटीमुळे गेल्या काही दिवसांत भाजप-शिवसेना यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती कमी होण्यास मदत होते का? की पुन्हा एकदा शिवसेना या भेटीनंतर भाजपाला शालजोडीतील हाणणार हे बघणे, औत्सुक्याचे ठरणार आहे.

अमित शाह २०१४ विधानसभा निवडणुकीच्या आधी चर्चेसाठी मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर शिवसेनेचे लांगुनचालन करायचे नाही, मातोश्रीवर जायचे नाही असा अलिखित निर्धार अमित शाह यांनी केला होता. मात्र, चार वर्षाच्या आतच पुन्हा एकदा 'मातोश्री'वारी करण्याची, शिवसेनेला गळ घालण्याची वेळ अमित शाह यांच्यावर आलेली आहे.