मुंबई : झी 24 तासच्या यंदाचा अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्काराने पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देणा-या विभूतींचा झी 24 तास अनन्य सन्मान हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यासपीठावर बोलताना लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही लतादीदींचे खास किस्सा सांगितला. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे एक विशेष मागणीही केली.
राज ठाकरेंनी सांगितला तो किस्सा
'ज्या दिवशी दीदी गेल्या त्या दिवशी मला एक व्यक्ती भेटली. ती व्यक्ती माझ्या घरी चालली होती. त्यांनी फार छान सांगितलं. अहो लतादीदींना तुम्ही पाहिलंय भेटला आहात आम्ही कधीच भेटलो नाही. आम्ही त्यांची गाणी ऐकत आलोय त्यामुळे आम्ही ऐकत राहू आमच्यासाठी त्या कुठे गेल्या.'
राज ठाकरेंनी गडकरींकडे केली मागणी
नितीन गडकरी देशात खूप मोठे प्रकल्प करतात. तुम्ही एक असा मोठा प्रकल्प करावा आणि त्याला लतादीदींचं नाव द्यावं. तो प्रकल्प विलक्षण असावा एवढा विलक्षण की त्याला लतादीदींचं नाव शोभलं पाहिजे.
माजातल्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देणा-या विभूतींचा झी 24 तास अनन्य सन्मान हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यंदाचा अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना देण्यात आला.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना या वर्षीचा अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कारानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'मी झी वाहितीने मनापासून आभार मानतो. हा माझा सन्मान पाहायला दीदी हवी होती. आज ती नाहीय त्यामुळे मला फारसा आनंद होत नाही. असं बोलताना हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.