Andheri By Poll Election! अंधेरी परिसरात 1 नोव्हेंबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक मतदानप्रक्रिया 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. 

Updated: Nov 2, 2022, 09:33 PM IST
Andheri By Poll Election! अंधेरी परिसरात 1 नोव्हेंबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू title=
Andheri By Poll Election Curfew applicable in Andheri area from November 1 to November 3 nz

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक मतदानप्रक्रिया 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. ऋतुजा रमेश लटके – शिवसेना (ठाकरे गट), बाला नाडार – आपकी अपनी पार्टी (पिपल्स), मनोजकुमार नायक – राईट टू रिकॉल पार्टी, मिलिंद कांबळे – अपक्ष, राजेश, त्रिपाठी – अपक्ष , निना खेडेकर – अपक्ष, फरहान सय्यद – अपक्ष अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारींची नावे आहेत. (Andheri By Poll Election Curfew applicable in Andheri area from November 1 to November 3 nz)

हे ही वाचा - भारत-बांगलादेश सामना आणि बिर्याणी, तंदूरीची पार्टी, सरकारी कार्यालयात रंगली पार्टी

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक मतदानप्रक्रिये दरम्यान अंधेरी परिसरात 1 नोव्हेंबरपासून आणि 3 नोव्हेंबरपर्यंत मतदानाच्या दिवसांपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील अंधेरी (पूर्व) परिसरातील हॉटेल्स आणि दारूच्या दुकानांना बंदी घातली आहे. महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा मद्यविक्री करण्यास परवानगी मिळेल. 

हे ही वाचा - परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल 6 नोव्हेंबर हा दिवशी जाहीर होणार. या दिवशीही मद्य विक्रीस बंदी घातली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीला बंदी होती. या बंदीवर आवाज उठवण्यासाठी राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट असोसिएशनने हायकोर्टात आव्हान दिले होते. 

हे ही वाचा - शिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर