अंगणवाडी सेविकांचे कामबंद आंदोलन

 अंगणवाडी सेविकांनी जिल्हावार जेलभरो आंदोलन केले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 6, 2017, 04:10 PM IST
अंगणवाडी सेविकांचे कामबंद आंदोलन  title=

कृष्णात पाटील, मुंबई :  राज्यभरातील अंगवाडी सेविकांनी २५ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेल्या मानधन वाढीच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. सरकारकडून दाद न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे.

मागणी पूर्ण न झाल्याचा निषेध म्हणून अंगणवाडी सेविकांनी जिल्हावार जेलभरो आंदोलन केले आहे. मुंबईतल्या आझाद मैदानातही अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढत सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला. राज्यभरात दोन लाख अंगणवाडी सेविका या आंदोलनात उतरल्या आहे.

याआधीही अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन केले आहे. पण अनेकदा या मागण्या पूर्ण न झाल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये संताप वाढीस चालला आहे. त्यामूळे या आंदोलनाला व्याप्त प्राप्त झाले आहे.  सरकार मागण्या पूर्ण करत नसल्याने आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

सध्याा मिळतात ५ हजार 

अंगणवाडी सेविकांना ५ हजाराचे मानधन मिळत आहे तर मदतनिसांना अडीच हजार मानधन दिलं जातंय. सेवाज्येष्ठतेनुसार हे मानधन ८ हजार ते १३ हजार ५०० रूपयांपर्यंत वाढवण्याची प्रमुख मागणी आहे. 

सेनेचा पाठींबा

 राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना ६५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मानधनवाढीवर अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी ठाम आहेत. अंगणवाडी सेविकांच्या संपाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अंगणवाडी सेविकांचे म्हणणे कानावर घातले होते.