अपघातानंतर अभिनेता अनिकेत विश्वासरावची प्रतिक्रिया

अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना सकाळी घडलीये. या अपघातातून दोनही कलाकार सुखरुप बचावलेत. 

Updated: May 14, 2018, 11:40 AM IST
अपघातानंतर अभिनेता अनिकेत विश्वासरावची प्रतिक्रिया title=

मुंबई : अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना सकाळी घडलीये. या अपघातातून दोनही कलाकार सुखरुप बचावलेत. अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या हाताला दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहे. अनिकेतला मात्र कोणतीही दुखातप झालेली नाहीये. अपघातानंतर अनिकेतने पहिल्यांदा याबाबत प्रतिक्रिया दिलीये. अनिकेत म्हणाला. लोणावळ्याच्या अलीकडे अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी बॅरिकेडला धडकली. हा अपघात मोठा होता. प्रार्थनाच्या उजव्या हाताला दुखापत झाली. आम्हाला मोठी दुखापत झाली नाही. मात्र अपघात मोठा होता. प्रार्थनावर जवळच्या यश रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पाहा काय म्हणाला अनिकेत 

प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थनाची सहाय्यक स्वाती यांच्या फॉरचुनर गाडीला लोणावळ्याजवळ हा अपघात झालाय. मुंबईहून कोल्हापूर ला मस्का च्या प्रमोशन साठी हे निघाले होते. अनिकेत पुढे बसला होता, तो झोपला होता त्यामुळे त्याला नक्की काय झालं ते कळलं नाही. पोलिस आणि स्थानिकांनी तात्काळ तिथे धाव घेतली आहे.