CBI ने दाखल केलेली FIR रद्द व्हावी यासाठी अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव

अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयने दाखल केली आहे एफआयआर

Updated: May 3, 2021, 10:23 PM IST
CBI ने दाखल केलेली FIR रद्द व्हावी यासाठी अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव

मुंबई : सीबीआयने दाखल केलेली एफआयआर रद्द व्हावी यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. 

सीबीआयने परमबीर सिंग यांच्या पत्रावर अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्याचबरोबर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. ही एफआयआर रद्द व्हावी यासाठी अनिल देशमुख यांनी ही याचिका दाखल केली आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला अनिल देशमुख यांच्या प्राथमिक चौकशीचे निर्देश दिले आहेत. यानंतर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.