जंगलात प्राणी एकमेकांच्या मदतीला धावून येतात

जंगलात पाणवठ्यावर एका वाईल्डबीस्टवर मगरीने हल्ला केला, मगरीने आपल्या मिठीत त्याचा पाय खेचला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 1, 2017, 08:16 PM IST

मुंबई : जंगलात पाणवठ्यावर एका वाईल्डबीस्टवर मगरीने हल्ला केला, मगरीने आपल्या मिठीत त्याचा पाय खेचला, त्याला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला, अनेक वेळ संघर्ष केल्यानंतर दिसत होतं, त्याला आता मगर पाण्यात खेचून नेईल त्याचा खेळ संपला. 

सर्व शिकारी ही दृश्य नजरलावून पाहत होते, पण क्रिकेटच्या मॅच सारखा जंगलातल्या संघर्षाचीही बाजू बदलली, दोन पाणघोडे, त्याच्या मदतीला धावून येताच मगरीने पाण्यात असा पळ काढला की मगर दिसलीच नाही, पण वाईल्डबीस्टचे प्राण वाचले.