शहिद मेजर प्रसाद महाडिक यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शाहिद मेजर प्रसाद महाडिक याचं पार्थिव लष्करी इतमामात अंत्य संस्कार झाले. 

Updated: Jan 2, 2018, 05:07 PM IST
शहिद मेजर प्रसाद महाडिक यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार title=

मुंबई : शाहिद मेजर प्रसाद महाडिक याचं पार्थिव लष्करी इतमामात अंत्य संस्कार झाले. 

त्यांच्या राहत्या घरी विरार येथे पार्थिव आणण्यात आले होते. आर्मीच्या शासकीय वाहनातून हे पार्थिव आणण्यात आले. विरार पाश्चीम सेन्ट्रल पार्क यशवंत दीप या सोसायटी त्याच्या राहत्या घरात पार्थिव आणण्यात आले.विरार पश्चिम विराट नगर येथील स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. 

प्रसाद महाडिक गुहागर कुटगिरीसारख्या दुर्गम भागातून सैन्यदलात भरती झाला. मात्र, तवंग-अरूणाचल सीमेवर दारूगोळ्याचं चेकिंग करत असताना टँकला लागलेल्या आगीमुळे स्फोट झाला आणि त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. प्रसाद महाडीक यांचं मुळ गाव गुहागर तालुक्यातील कुटगिरी गाव असून या गावावर सध्या शोककळा पसरलीय. प्रसाद महाडीक आपलं कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांचं प्रथमिक शिक्षण कुटगिरीमधील जिल्हापरिषदेच्या शाळेत झालं.

तर त्यानंतर ते वडिलांच्या नोकरी निमित्त मुंबईला गेले. दरम्यान, कुटगिरी गावात त्यांचं घरही आहे. महाडिक यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि धाकटी बहीण असा परिवार आहे.