दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग

राज्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच कोसळणार असल्याचं सांगण्यात येतंय

Updated: May 28, 2019, 02:04 PM IST
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग   title=

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : राज्य दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असताना मान्सून जूनच्या तिसऱ्या आठड्यात येण्याचा अंदाज आहे. त्यामुळं राज्य सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला परवानगी देण्यात आलीय. मान्सून अंदमानात आला असला तरी तो केरळमध्ये यायला उशीर होणार आहे. शिवाय राज्यातही यंदा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच कोसळणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं राज्य सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतलाय.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

- येत्या पावसाळ्यात पर्जन्यवाढीसाठी राज्यात उपाययोजना (Aerial Cloud Seeding) करण्यास मान्यता

- राज्यात मध उद्योगाला चालना देण्यासाठी मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविणार

- राज्यातील विदर्भ, मराठवाडा क्षेत्रातील उद्योग घटकांना विद्युत शुल्क माफीची सवलत पाच वर्षांसाठी वाढविण्यास मान्यता

- पुणे आणि कोल्हापूर येथे मंजूर करण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरसाठी ९२ पदांची निर्मिती

- आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्यासाठी बारामती नगर परिषदेंतर्गत असलेल्या क्रीडांगणाच्या आरक्षणात बदलास मान्यता

- फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यास जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पूर्व हंगामी अल्प मुदत कर्ज घेण्यासाठी सात कोटी रुपयांची शासन थकहमी

- नियुक्त्या, सेवाज्येष्ठता, पदोन्नती आदींबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे समावेशन सार्वजनिक बांधकामकडून काढून पुन्हा वन विभागाकडे